Fri, May 24, 2019 03:11होमपेज › Goa › कोने प्रियोळ अपघातात स्कूटरस्वार ठार

कोने प्रियोळ अपघातात स्कूटरस्वार ठार

Published On: May 31 2018 1:36AM | Last Updated: May 31 2018 12:13AMफोंडा : प्रतिनिधी

कोने  प्रियोळ  येथील धोकादायक वळणावर बुधवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास स्कूटर व कार यांचा अपघात झाला. यामध्ये अनुप नारायण शेट (44, गोलवाडा- कुंभारजुवे) या स्कूटरस्वाराचा मृत्यू झाला. अपघातप्रकरणी कारचालक महेश विश्‍वनाथ नाईक (53, कवळे-फोंडा) याला पोलिसांनी अटक केली आहे.  

अनुप शेट फोंड्याहून इटर्नो स्कूटर (जीए-03-डी-8794) घेऊन म्हार्दोळच्या दिशेने जात होते. कोने येथील धोकादायक वळणावर आल्यानंतर विरुद्ध दिशेने आलेल्या वॅगनार कारची (जीए-05-बी-1705) धडक स्कूटरला बसली.  फोंडा वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीण गावस यांनी  त्वरित पोलिस वाहनातून जखमीला  इस्पितळात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती अनुप शेट याला मृत  घोषित केले. 
या अपघातात अनुप शाला डोक्याला गंभीर झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर स्कूटरही चक्‍काचूर झाली आहे.  फोंडा  पोलिस ठाण्याचे  अतिरिक्‍त निरीक्षक निलेश धायगोडकर व उपनिरीक्षक परेश सिनारी यांनी अपघाताचा पंचनामा केला.  कारचालक महेश नाईक याला ताब्यात घेऊन रात्री उशिरा अटक केली. अपघातानंतर परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक निरीक्षक प्रवीण गावस यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.