Fri, Jun 05, 2020 22:13होमपेज › Goa › संध्या होबळेंना अबकारी खात्याकडून ‘शोकॉज’

संध्या होबळेंना अबकारी खात्याकडून ‘शोकॉज’

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 11:27PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

रायबंदर पणजी कॉजवेवरील  हॉटेलला देण्यात आलेले दोन अबकारी परवाने रद्द का केले जाऊ नयेत, अशी कारणे दाखवा नोटीस अबकारी  आयुक्‍त अमित सतिजा यांनी    संध्या होबळे यांना गुरुवारी  बजावली.

संध्या होबळे यांना सात दिवसांत  कारणे दाखवा नोटिसीला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर अबकारी आयुक्‍तांसमोर शुक्रवारी 2 जानेवारी 2018 रोजी सकाळी 11 वाजता सुनावणीसाठी हजर  राहण्याचेही  निर्देश दिले आहेत.

संध्या होबळे या भाजप प्रदेश उपाध्यक्ष  अनिल होबळे यांच्या  पत्नी आहेत. संध्या होबळे, अनिल होबळे व पुत्र मिलिंद होबळे यांच्याविरोधात   पणजीच्या महिला पोलिस स्थानकात   सुनेचा हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

या प्रकरणी पोलिसांकडून 10 नोव्हेंबर रोजी पणजीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर आरोपपत्र देखील सादर करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या व्यक्‍तीवर गुन्हा नोंद असेल त्याला अबकारी परवाना मंजूर केला जाऊ शकत नाही. संध्या होबळे यांच्या नावे असलेले दोन्ही अबकारी  परवाने रद्द केले जावेत, अशी मागणी करणारी तक्रार आरटीआय कार्यकर्ते अ‍ॅड. आयरीश रॉड्रिग्स यांनी अबकारी आयुक्‍तांकडे दाखल केली आहे. या तक्रारीस अनुसरून अबकारी आयुक्‍तांनी सदर नोटीस बजावली आहे.