Mon, Nov 19, 2018 23:13होमपेज › Goa › साळगाव कचरा प्रकल्प क्षमता २५० टनांपर्यंत वाढवणार

साळगाव कचरा प्रकल्प क्षमता २५० टनांपर्यंत वाढवणार

Published On: Dec 03 2017 12:44AM | Last Updated: Dec 03 2017 12:40AM

बुकमार्क करा

पणजी ः प्रतिनिधी

राज्यात चार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करून कचरामुक्त गोव्याच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरू आहे. सध्या कार्यरत असलेल्या साळगाव कचरा प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 250 टनांपर्यंत वाढविली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.

पणजीत शनिवारी रोटरी क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले,  साळगाव कचरा प्रक्रिया प्रकल्पाची सध्याची प्रतिदिन क्षमता 120 टन एवढी आहे. या प्रकल्पामुळे पेडणे आणि बार्देश तालुक्यातील कचरा समस्या सुटेल. बायंगिणी प्रकल्पामुळे तिसवाडी तालुका कचरामुक्त होईल. वेर्णा येथे येणार्‍या कचरा प्रकल्पामुळे सासष्टी, मुरगाव तालुके आणि काकोडा येथील कचरा प्रकल्पामुळे सांगे, केपेतील कचरा समस्या दूर होईल.

बांधकाम कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारने एका ठिकाणी जागा निश्‍चित केली आहे. ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू  आहे. प्रत्येकाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे टाळावे. प्लास्टिकचा भटक्या गुरांसह, मानवी जीवनावरही प्रतिकूल परिणाम होत आहे, असे मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले.