Tue, May 21, 2019 18:14होमपेज › Goa › साळगावात चरस विक्री; नायजेरियन युवकास अटक

साळगावात चरस विक्री; नायजेरियन युवकास अटक

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 22 2018 12:31AMपणजी : प्रतिनिधी  

साळगाव येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने मिकेल ओकोरा (वर 32)  या नायजेरियन युवकास अटक केली. त्याच्याकडून 2 लाख रुपये किमतीचा 1.150 किलो चरस जप्‍त करण्यात आला. कारवाईदरम्यान संशयित ओकोरा  याच्याकडून 300 रुपये रोख, मोबाईल फोन व यामाहा फसिनो दुचाकीही जप्‍त करण्यात आली.

साळगाव येथील माहिती तंत्रज्ञान व पर्यावरण खात्याच्या प्रवेशद्वारासमोर अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपनिरीक्षक नाथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्राप्‍त माहितीच्या आधारे 19 एप्रिल रोजी रात्री 8.10 ते 11.30 दरम्यान ही कारवाई करण्यात आली. ओकोरो विरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस कोठडीत त्याला ठेवले असून  पोलिस पुढील तपास करीत आहेत.

 

Tags : goa, panaji news, crime, charas Sale, Nigerian youth arrested,