Fri, Jul 19, 2019 17:45होमपेज › Goa › दिगंबर कामत, हेदेंविरोधात एसआयटीचे आरोपपत्र 

दिगंबर कामत, हेदेंविरोधात एसआयटीचे आरोपपत्र 

Published On: Jan 19 2018 1:50AM | Last Updated: Jan 18 2018 11:23PMपणजी : प्रतिनिधी

प्रफुल्‍ल हेदे यांच्या कुळे येथील खाण लिज नूतनीकरण तसेच कंडोनेशन प्रमाणपत्र देण्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या  विशेष तपास पथकाने (एसआयटी) माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत,  खाण मालक हेदे व खाण खात्याचे अधिकारी  ए. टी. डिसोझा यांच्या विरोधात  दक्षिण गोव्याच्या  प्रधान  जिल्हा सत्र न्यायालयात गुरुवारी 1572 पानी आरोपपत्र दाखल केले.

या आरोपपत्रात 40 साक्षीदारांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती एसआयटीच्या सूत्रांनी दिली.  या  खाण घोटाळ्याप्रकरणी 19 सप्टेंबर 2014 रोजी एसआयटीकडून गुन्हा नोंद करण्यात आला होता. प्रफुल्‍ल हेदे खाण घोटाळ्याप्रकरणी कामत यांची एसआयटी पथकाकडून चौकशी करण्यात आली आहे.   

याप्रकरणी आपल्याला अटक होईल, या भीतीने कामत यांनी पणजी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने कामत यांना अटक करण्यापूर्वी एसआयटीने त्यांना 48 तास अगोदर त्यासंबंधी पूर्वकल्पना द्यावी असे  निर्देश दिले आहेत. हेदे यांच्या कुळे येथील खाण लिजाच्या नूतनीकरणासाठी बेकायदेशीरपणे  ककंडोनेशन प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी  कामत यांच्यासह अन्य दोघा संशयितांवर एसआयटीकडून आरोप ठेवण्यात आले आहेत.