Tue, May 21, 2019 13:07होमपेज › Goa › ‘एस. दुर्गा’चे सेन्सॉर प्रमाणपत्र सादर करा

‘एस. दुर्गा’चे सेन्सॉर प्रमाणपत्र सादर करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

48 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचे (इफ्फी) संचालक सुनीत टंडन यांनी वादग्रस्त ‘एस. दुर्गा’ चित्रपटाचे दिग्दर्शक सनल शशीधरन यांना सदर चित्रपटाची 35 एमएम  प्रिंट आणि  सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले आहे. 

बहुचर्चित ‘एस. दुर्गा’  हा चित्रपट इफ्फीमध्ये प्रदर्शित करण्याला स्थगिती देण्यास केरळच्या उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने शुक्रवारी नकार दिला होता, तरीदेखील केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि इफ्फी संचालनालयाने यासंबंधी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. सदर चित्रपटाचा समावेश इफ्फीच्या प्रदर्शन कार्यक्रमात केल्यास वेळापत्रक कोलमडण्याची भीती  आयोजकांनी व्यक्त केली होती. येत्या मंगळवारी (दि.28)  इफ्फीचा समारोप होणार आहे. केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यात एकूण तेरा ज्युरींपैकी फक्त तीन ज्युरी सध्या गोव्यात आहेत. तीन ज्युरींनी यापूर्वीच राजीनामा दिलेला आहे. ज्युरींना एस. दुर्गा कधी दाखविला जाईल ते अजून स्पष्ट झालेले नाही. यामुळे ‘एस. दुर्गा’ इफ्फीमध्ये प्रदर्शित होण्याबद्दल साशंकता  निर्माण झाली आहे.

इफ्फीच्या आयोजकांतर्फे    संचालक सुनीत टंडन यांनी शनिवारी  सदर चित्रपटाच्या दिग्दर्शकांना पत्र लिहिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. टंडन यांचे सदर पत्र सोशल मीडियावर सध्या झळकत आहे. टंडन यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, ‘एस. दुर्गा’ चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र आणि दोन डीव्हीडी कॉपी इफ्फीच्या आयोजकांकडे सुपुर्द कराव्यात.

‘राष्ट्रप्रेमी नागरिक’चा विरोध
गोव्यातील ‘राष्ट्रप्रेमी नागरिक’ या एनजीओने इफ्फीच्या आयोजकांकडे वादग्रस्त ‘एस. दुर्गा’ न दाखवण्याची मागणी लेखी स्वरूपात केली आहे.