Thu, Jun 20, 2019 00:32होमपेज › Goa › आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘एस. दुर्गा’चे प्रदर्शन नाहीच

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘एस. दुर्गा’चे प्रदर्शन नाहीच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

वादग्रस्त मल्याळम् चित्रपट ‘एस. दुर्गा’ ला 48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  (इफ्फी) शेवटी अपयशच पदरात पडले. न्यायालयीन आदेश असूनही इफ्फीत चित्रपट दाखवण्यात न आल्याने आपण केरळ उच्च न्यायालयात पुन्हा धाव घेणार असून सदर चित्रपट केरळमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावेळी येत्या 6 डिसेंबर रोजी  दाखवणार असल्याचे दिग्दर्शक सनलकुमार शशीधरन यांनी सांगितले. इफ्फीमध्ये ‘एस. दुर्गा’ प्रदर्शित न झाल्याने अनेक चित्रपट कलाकार व  निर्मात्यांनी मंगळवारी  निषेध नोंदवला. इफ्फीस्थळी एस. दुर्गाच्या समर्थक कलाकारांनी प्रतीकात्मक निदर्शनेही केली. दरम्यान, सदर चित्रपटाच्या नावाविषयी नव्याने वाद सुरू झाला आहे.