Mon, Oct 21, 2019 02:53होमपेज › Goa › वास्कोत मोबाईल दुकान फोडून 35 लाखांचा ऐवज लंपास  

वास्कोत मोबाईल दुकान फोडून 35 लाखांचा ऐवज लंपास  

Published On: Jul 17 2018 1:33AM | Last Updated: Jul 16 2018 11:17PMदाबोळी : प्रतिनिधी 

मुंडले वाडे वास्को येथील मोबाईल दुकानाचे शटर तोडून 35 लाखांचा ऐवज पळवल्याचा प्रकार सोमवारी (दि.16) सकाळी उघडकीस आला. वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री मुंडवेल वाडातील वास्को शिपयार्डनजीक एनआरबी नोबर्टस जवळ असलेल्या सॅमसंग एमझोन या मोबाईल दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानातून  तब्बल 35 लाखांचे मोबाईल संच व एक्सेसरीज लंपास केल्या.

दुकानाच्या मालक प्रिया साळकर रविवारी रात्री दुकान बंद करुन गेल्या व सकाळी त्या परत दुकानात आल्या असता त्यांना दुकानाचे शटर वाकलेल्या स्थितीत आढळले. तसेच मध्यभागी असलेले कुलुप तोडलेले आढळून आले. त्यांनी शटर उघडून आत प्रवेश केला असता दुकानातील मोबाईल संच व एक्सेसरीज गायब झालेल्या दिसल्या. त्यांनी आपल्या पतीला फोन करुन याविषयी माहिती दिली. तसेच वास्को पोलिसांना ही माहिती दिली असता पोलिस घटनास्थळी आले. यावेळी श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले पण त्याचा काही फायदा झाला नाही. वास्को पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ उपअधीक्षक सुनिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत. WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19