Sun, Jul 21, 2019 05:36होमपेज › Goa › खाणबंदी आदेशाच्या कार्यवाहीचा आढावा

खाणबंदी आदेशाच्या कार्यवाहीचा आढावा

Published On: Mar 22 2018 1:42AM | Last Updated: Mar 22 2018 1:42AMपणजी : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या  खाणबंदीच्या आदेशाच्या पालनासंबंधी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव पी. कृष्णमूर्ती यांनी संबंधित अधिकार्‍यांसह बुधवारी खास बैठक घेऊन चर्चा केली.

खाणबंदीचा निर्णय 15 मार्चच्या संध्याकाळपासून अंमलात आला असून त्यासंबंधित पहिली प्रशासकीय बैठक बुधवारी सकाळी सचिवालयात झाली. या बैठकीत मुख्य सचिव धर्मेश शर्मा, पोलिस महासंचालक मुक्‍तेश चंदर, खाण खात्याचे सचिव दौलत हवालदार, उत्तर गोवा जिल्हाधिकारी निला मोहनन, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अंजली शेरावत, पोलिस अधीक्षक चंदन चौधरी, अधीक्षक अरविंद गावस, इंडियन ब्युरो ऑफ माईन्सचे उपनियंत्रक प्रेम कुमार व खाण खात्याचे संचालक प्रसन्‍न आचार्य आदी अधिकारी उपस्थित होते. 

शर्मा यांनी खाणबंदीनंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. राज्यातील खाणीतून  किती खनिजाचे उत्खनन 15 मार्चपर्यंत झाले. किती खनिजाची वाहतूक लिजमधून झाली, याची माहिती घेतली. फक्‍त लिजेसच्या बाहेर असलेल्या   खनिजाची आणि त्या खनिजाची रॉयल्टी भरलेली असेल तरच वाहतूक करण्यास सध्या परवानगी दिल्याचे शर्मा यांनी सांगितले.  संचालक आचार्य यांनी खनिज वाहतुकीवर जीपीएस आणि संकेतस्थळावरून नियंत्रण ठेवले जात असल्याचे सांगितले. खाण भागातील सुरक्षा आणि पोलिस बंदोबस्ताची माहिती चंदर यांनी दिली.