Sat, May 30, 2020 12:06होमपेज › Goa › निवृत्त मुख्य सचिव डॉ. जे. सी. आल्मेदा यांचे निधन

निवृत्त मुख्य सचिव डॉ. जे. सी. आल्मेदा यांचे निधन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

राज्य प्रशासनात मुख्य सचिवपदी सेवा बजावणारे एकमेव गोमंतकीय  डॉ. जुझे कॉन्सेसांव आल्मेदा (वय 87) यांचे मंगळवारी निधन झाले. 

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कार्यकाळात डॉ. जे. सी. आल्मेदा यांनी मुख्य सचिवपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. पोर्तुगीज नोकरशहामध्ये सेवेत असलेले डॉ. आल्मेदा हे लिस्बनहून गोव्यात परतल्यानंतर त्यांनी सांख्यिकी खाते सुरू केले. त्यानंतर कांझा दी इकॉनोमिका दी गोवा या ग्रामीण बँकेची जबाबदारी त्यांच्याकडे होती.  

यूपीएससी परीक्षा दिल्यानंतर विविध राज्यांतील प्रशासकीय पदांवर त्यांनी सेवा बजावली. राज्यात परतल्यानंतर प्रारंभी विकास आयुक्‍त आणि 1979 मध्ये त्यांच्याकडे मुख्य सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या पदावर राहिलेले ते एकमेव गोमंतकीय ठरले आहेत. गोवा आर्थिक विकास महामंडळ, तसेच गोवा लोकसेवा आयोगाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.