Sat, Feb 23, 2019 20:17होमपेज › Goa › कर्नाटकाविरूद्ध विधानसभेत आणणार ठराव: उपसभापती लोबो

कर्नाटकाविरूद्ध विधानसभेत आणणार ठराव: उपसभापती लोबो

Published On: Jan 30 2018 1:23AM | Last Updated: Jan 30 2018 1:13AMपणजी : प्रतिनिधी

म्हादई नदीचे पाणी वळविण्याचे कारस्थान करत असलेल्या कर्नाटक सरकारच्या विरोधात  आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठराव आणला जाणार आहे,अशी माहिती उपसभापती तथा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले. 

सभापती प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली रविवारी कणकुंबी- कर्नाटकातील कळसा प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी  गेलेल्या शिष्टमंडळात लोबो यांचा सहभाग होता. या भेटीविषयी पत्रकारांशी बोलताना लोबो म्हणाले, की कर्नाटकाने भूमिगत कालवा बांधून  म्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीत वळवण्यात आल्याचे गोव्यातील पथकाला रविवारी आढळून आले. यामुळे गोव्याकडे वाहणारा जलप्रवाह कमी झाला असून जर कर्नाटकाने बांधलेले बंधारे पूर्णपणे काढून न टाकल्यास गोव्याला भविष्यात पाण्याची टंचाई   जाणवणार आहे. यासाठी सर्व आमदारांच्या सहकार्याने कर्नाटकाच्या या चालीविरूद्धचा ठराव येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या अधिवेशनात मांडला जाणार आहे. यासंबंधी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विश्‍वासात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असेही लोबो म्हणाले.