Thu, Jan 17, 2019 10:12होमपेज › Goa › प्रजासत्ताक दिन संचलनासाठी फ्रेडियर वाझची निवड 

प्रजासत्ताक दिन संचलनासाठी फ्रेडियर वाझची निवड 

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 25 2018 12:06AMमडगाव :  प्रतिनिधी

नवी दिल्लीत 26 जानेवारी रोजी होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये भाग घेण्यासाठी मडगावच्या लॉयोला हायस्कूलचा नववीचा विद्यार्थी फ्रेडियर वाझ याची निवड करण्यात आली आहे.  

गोव्यातून तब्बल 13 वर्षानंतर या संचलनासाठी अशी  विद्यार्थ्याची निवड झाली असून   वाझ गोवा एनसीसी बटालियनचे प्रतिनिधीत्व करणार आहे.  वाझ हा मूळ कांसावली येथील   कोकण रेल्वेत काम करणार्‍या विल्सन व एस्तेरेलिया वाझ यांचा पुत्र आहे. फ्रेडियर हा उत्कृष्ट  गिटार वादकही आहे. या परेडमध्ये निवड होण्यापूर्वी त्याने धारवाड, बेळगावी, गदग, म्हैसूरु, बंगळुरू अशा विविध ठिकाणी झालेल्या  दहापेक्षा अधिक प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला  आहे.