Fri, Jul 19, 2019 14:28होमपेज › Goa › मोटर वाहन कायद्यात दुरुस्ती करा

मोटर वाहन कायद्यात दुरुस्ती करा

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 11:54PMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील  टॅक्सीमालकांच्या समस्या लक्षात घेऊन सरकारने  आगामी विधानसभा अधिवेशनात  मोटर वाहन कायद्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शांताराम नाईक यांनी पणजीत पत्रकार परिषदेत केली. या संदर्भात काँग्रेस विधिमंडळ गटात ठराव संमत केला जाईल. तसेच मोटर वाहन कायद्यात दुरुस्ती करण्याविषयी काँग्रेसतर्फे खासगी विधेयक विधानसभेत मांडले जाणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

अ‍ॅड. नाईक म्हणाले, वाहनांना स्पीड गव्हर्नर बसवण्याची अट शिथिल  करण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात  जाणार असल्याचे लेखी  आश्‍वासन मुख्यमंत्र्यांच्या वतीने उपसभापती मायकल लोबो यांनी  संपकरी  पर्यटक  टॅक्सी  मालकांना दिले. उपसभापती हे पद महत्वाचे असल्याने त्यांनी आझाद मैदानावर जाऊन  हे आश्‍वासन देणे योग्य नव्हे.  त्यांच्याऐवजी आमदाराने ते देणे योग्य ठरले असते. टॅक्सी मालकांचा संप हा काँग्रेस शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले असल्याने मिटला.

राज्यातील टॅक्सी मालकांना भेडसावणार्‍या विविध समस्यांवर  सरकारने तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यासाठी आगामी विधानसभा अधिवेशनात मोटर वाहन कायद्यात दुरुस्तीसाठी पावले उचलावीत. मोटर  वाहन कायदा हा केंद्र सरकारचा असला तरी सरकारने सदर दुरुस्ती करून ती केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवावी. मग पुढील निर्णय केंद्र सरकारवर सोडावा, असेही नाईक म्हणाले.