Fri, Nov 16, 2018 22:16होमपेज › Goa › बार्जद्वारे खनिज वाहतुकीस नकार   

बार्जद्वारे खनिज वाहतुकीस नकार   

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

राज्यातील खनिज वाहतुकीवरील बंदी आदेशात बदल करण्याच्या मागणीसंदर्भात खाण कंपन्यांनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी (दि.29) फेटाळल्या.न्यायालयाने बुधवारी खनिज वाहतूक बंद करण्याचा आदेश दिला होता. सदर आदेशात बदल करून खनिज मालाची जेटीवरून बार्जद्वारे वाहतूक करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती खाण कंपन्यांनी गुरुवारी न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. खनिज मालाची वाहतूक रस्त्याद्वारे होणार नसल्याने प्रदूषणाचा प्रश्‍न  उद्भवणार नसल्याचा दावा या याचिकांमध्ये   केला  होता.

वेदांता लिमिटेड, व्ही. एम साळगावकर अ‍ॅण्ड ब्रदर्स, फोमेंतो, फोमेंतो रिसोर्सीस प्रा. लि. व अंबर तिंबलो तसेच एमपीटीने या याचिका दाखल केल्या होत्या.  सर्वच याचिकादार कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातील तरतुदीनुसार 16 मार्चपूर्वी रॉयल्टी भरली असल्याने खनिज माल वाहतुकीला परवानगी मिळावी, अशी विनंती केली.

मात्र, सरकार पक्षाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे समर्थन करून रस्ते, जल वाहतुकीसह सर्वप्रकारच्या खनिज वाहतुकीवर बंदी लागू असल्याचा मुद्दा मांडून खाण कंपन्यांचा मुद्दा खोडला.

सरकार घेणार अ‍ॅड. हरिष साळवेंचा सल्ला 

सर्वोच्च न्यायालयाच्या खाणबंदीच्या आदेशाबाबत फेरविचार याचिका दाखल करण्यासंदर्भात राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील  अ‍ॅड. हरिष साळवे यांचा सल्ला घेण्याचे निश्‍चित झाले आहे. साळवे हे देशाचे माजी अ‍ॅटर्नी जनरल असून ते गोवा सरकारला मोफत सल्ला देण्यास राजी झाले आहेत, अशी माहिती नगर नियोजन  मंत्री विजय सरदेसाई यांनी दिली. 

 

Tags : Panaji, Panaji news, Mineral, mineral transport, Rejecting 


  •