Sat, Mar 23, 2019 18:09होमपेज › Goa › खनिज निर्यातीबाबत आज सरकारतर्फे प्रतिज्ञापत्र 

खनिज निर्यातीबाबत आज सरकारतर्फे प्रतिज्ञापत्र 

Published On: Apr 18 2018 12:48AM | Last Updated: Apr 19 2018 1:34AMपणजी : प्रतिनिधी

रॉयल्टी भरलेल्या खनिजाच्या निर्यातीसाठी राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात बुधवारी (दि.18)  प्रतिज्ञापत्र दाखल केले जाणार आहे. त्रिमंत्रीय सल्लागार समितीला 66 पानी प्रतिज्ञापत्रासंबंधीची माहिती मुख्य सचिव धर्मेश शर्मा यांनी दिली असल्याचे नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले. खाणबंदीबाबत सरकारची भूमिका निश्‍चीत करण्यासाठी मंगळवारी त्रिमंत्रीय सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. 

बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना मंत्री सदेसाई म्हणाले की, राज्यातील लिज क्षेत्रातील  आणि  लिज क्षेत्राबाहेर मिळून सुमारे 7.20 दशलक्ष टन खनिज अस्तित्वात आहे. लिज क्षेत्रात 5.70 दशलक्ष टन खनिजाचा साठा पडून असून विविध जेटीवर सुमारे  1.50 दशलक्ष टन खनिज आहे. या खनिजांच्या दर टनामागे 250 रूपयांची रॉयल्टी खाण कंपन्यांनी भरली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारी रोजी दिलेल्या खाणबंदीच्या आदेशानंतर, 8 फेब्रुवारीपासून राज्यातून सुमारे 2 दशलक्ष टन खनिज लोहाची निर्यात करण्यात आली आहे. लिज क्षेत्राबाहेर असलेल्या खनिजावरील रॉयल्टी फेडण्यात आली असून ते निर्यात करण्यास हरकत नसल्याची सरकारची भूमिका आहे. 

खाणबंदीबाबत सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. आता लिज क्षेत्रातील आणि लिज क्षेत्राबाहेरील खनिजावर कोणाचा अधिकार असणार याबाबत सरकारकडून न्यायालयाकडे विचारणा केली जाणार आहे. यासंबंधी राज्य सरकारकडून मुंबई खंडपीठाच्या गोवा उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याची माहिती त्रिमंत्रीय समितीला मुख्य सचिवांनी दिली असल्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. 

Tags : goa news, Regarding mineral exports, Affidavit, government today,