Wed, Aug 21, 2019 19:21होमपेज › Goa › कॅसिनो परवाना शुल्कातील वाढ कमी करा

कॅसिनो परवाना शुल्कातील वाढ कमी करा

Published On: Apr 21 2018 1:14AM | Last Updated: Apr 21 2018 1:14AMपणजी : प्रतिनिधी 

ऑन शोर कॅसिनोंच्या  परवाना शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. त्यातच ऑफ शोर कॅसिनोंमुळे ऑन शोर कॅसिनोच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने   या शुल्क वाढीत 50 ते 70 टक्के कपात करावी, अशी मागणी ग्रँड 7 या ऑन शोर कॅसिनो व्यावसायिक  आनंद शेट्ये यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत केली.

शेट्ये म्हणाले, की सरकारने  ऑन शोर कॅसिनो परवान्याच्या शुल्कात  भरमसाठ वाढ केली आहे. त्यानुसार 100 चौरस मीटरच्या  कॅसिनोकडून परवाना शुल्क म्हणून 4  कोटी रुपयांवरुन 10 कोटी रुपये, 100 ते 300 चौरस मीटर चौरस मीटरच्या  कॅसिनोकडून 5 कोटी रुपयांवरुन 20 कोटी, 300 ते 500 चौरस मीटरच्या  कॅसिनोकडून 5.50 कोटी रुपयांवरुन  25 कोटी रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.
ऑन शोर प्रमाणेच ऑफ शोर कॅसिनोंच्या परवाना शुल्कात  देखील वाढ केली आहे.

राज्यात 8 ऑन शोर कॅसिनो असून त्यात केवळ  इलेक्ट्रॉनिक गेमिंग चालते. ऑफ शोर कॅसिनोंमध्ये लाईव्ह गेमिंग चालत असल्याने त्याकडे अधिक ग्राहक ओढले जातात.  ऑफ शोर कॅसिनों बोटीची क्षमता 300 ग्राहकांची असेल तर कॅसिनो बोटीत  700 ग्राहक असे क्षमतेपेक्षा जादा ग्राहक घेतले जातात. यामुळे ऑन शोर कॅसिनोंच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.ऑफ शोर कॅसिनों बोटीत क्षमतेपेक्षा जादा ग्राहक घेतले जात असले तरी  त्यावर नियंत्रणासाठी कुठलीच यंत्रणा नाही.  

ऑन शोर व ऑफ शोर कॅसिनोंच्या परवाना शुल्कात वाढ केली असली तरी ही वाढ समान असणे आवश्यक होती. परंतु ती तशी नाही. ऑन शोर कॅसिनोंच्या परवाना  शुल्कात केलेल्या  वाढीत  कपात करावी, अशी  मागणीही शेटये यांनी  केली. यावेळी बोगमाळो येथील  सुप्रिम कॅसिनो व  कॅसिनो गोल्ड नाव्होतेलचे  सी. शांतीकुमार उपस्थित होते. 

 

Tags : Goa, Panaji news, casino licensing fees, Reduce,