Thu, Jun 20, 2019 00:57होमपेज › Goa › गोवा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी रामकृष्ण सामंत

गोवा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी रामकृष्ण सामंत

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:32AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शैक्षणिक मंडळाच्या (बोर्ड) अध्यक्षपदी रामकृष्ण सामंत यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे परिपत्रक गोवा शिक्षण संचालनालयाने काढले आहे.  शिक्षण संचालक गजानन भट यांनी मंगळवारी काढलेल्या पत्रकात शिक्षण उपसंचालक रामकृष्ण सामंत यांना तत्काळ गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्षपद ताब्यात घेण्याचा आदेश दिला आहे. ही नेमणूक तत्काळ अंमलात आणली जाणार असून ती सुरुवातीला 4 वर्षांसाठी असणार आहे.