Sun, Nov 18, 2018 21:55होमपेज › Goa › गोवा डेअरी अध्यक्षपदी राजेश फळदेसाई

गोवा डेअरी अध्यक्षपदी राजेश फळदेसाई

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 09 2018 12:12AMफोंडा : प्रतिनिधी

आरोप-प्रत्यारोपामुळे तसेच अध्यक्षांवरील अविश्‍वास ठरावामुळे वादग्रस्त बनलेल्या गोवा डेअरीचे अध्यक्ष म्हणून राजेश फळदेसाई यांची मंगळवारी सकाळी बिनविरोध निवड करण्यात आली. माधव सहकारी यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव संमत  झाल्यानंतर अध्यक्षपद रिक्‍त झाले होते. 

गोवा डेअरीच्या अध्यक्षपदासाठी केवळ राजेश फळदेसाई यांचा एकट्याचाच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. डेअरीचे माजी अध्यक्ष माधव सहकारी, बाबुराव देसाई, विठोबा देसाई, गुरुदास परब, अजय देसाई, धनंजय देसाई, बाबू कोमरपंत, नरेश मळीक, राजेंद्र सावळ व असॅल्मो फुर्तादो हे संचालक तसेच सहकार खात्याचे अधिकारी सोनू गावणेकर व गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक नवसो सावंत उपस्थित होते. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजेश फळदेसाई यांनी सर्व संचालकांचे आभार मानले. दूध उत्पादकांसाठी हिताचे निर्णय घेऊन गोवा डेअरीला नवसंंजीवनी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच सध्याच्या अनेक समस्यांवर चर्चा करून मार्ग काढणार असल्याचेही अध्यक्ष  फळदेसाई यांनी सांगितले.