Mon, Jul 22, 2019 03:22होमपेज › Goa › वेश्या व्यवसाय; चौघांना अटक

वेश्या व्यवसाय; चौघांना अटक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

गुन्हा अन्वेषण विभागाने दोनापावला येथील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश  करून  एका महिला दलालासह  चार दलालांना अटक केली. या दलालांच्या तावडीतून दोन  युवतींचीही सुटका पोलिसांनी केली.

अटक केलेल्या दलालांमध्ये रियाना खान (वय 27, कर्नाटक), तन्वीर मुजावर (37, कर्नाटक), सहीद खान (23, कर्नाटक) व अंकित पटेल (25, गुजरात ) यांचा समावेश आहे. सुटका केलेल्या पीडित युवती या महाराष्ट्रातील असून त्यांची मेरशी येथील महिला  सुधारगृहात  रवानगी करण्यात आली आहे. 

दोनापावला येथे मंगळवारी  रात्री उशिरा हॉटेल सिदाद दी गोवानजीक ही कारवाई करण्यात आली.  संशयित दलाल  हे या पीडित मुलींना नोकरीचे आमिष दाखवून  त्यांना वेश्या व्यवसायात ढकलत होते. 

या पीडीत मुलींना वेश्या व्यवसायासाठी  ग्राहकांना ठराविक रक्‍कमेत विकण्यासाठी   दोनापावला येथे संशयितांनी गाडीतून आणले होते. पोलिसांनी   सापळा रचून ही कारवाई केली. गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतिश गावडे यांच्या मार्गदर्शनाखालील  पथकाने  ही कारवाई केली. याप्रकरणी  पोलिसांनी  संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरु आहे.

Tags : goa news, Prostitution business, Four arrested,


  •