Thu, Nov 15, 2018 05:16होमपेज › Goa › मडकईकर विरोधी तक्रारीची १९ रोजी प्राथमिक चौकशी

मडकईकर विरोधी तक्रारीची १९ रोजी प्राथमिक चौकशी

Published On: Jun 17 2018 1:35AM | Last Updated: Jun 17 2018 12:11AMपणजी : प्रतिनिधी

वीजमंत्री पांडुरंग मडकईकर  यांच्याविरोधातील बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची प्राथमिक चौकशी लोकायुक्त  पी. के. मिश्रा हे  19 जून रोजी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

आरटीआय कार्यकर्ते अ‍ॅड. आयरीश रॉड्रिग्स यांनी मडकईकर यांच्या विरोधात लोकायुक्तांकडे  7 जून रोजी तक्रार केली होती.  मडकईकर यांच्या बेहिशेबी मालमत्तेची कसून चौकशी करावी, अशी मागणीही या तक्रारीत करण्यात आली होती.

मडकईकर यांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी यापूर्वी 9 मे रोजी भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, महिना उलटला तरी अजूनही पथकाकडून आवश्यक ती कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याचेही अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी आपल्या तक्रारीव्दारे लोकायुक्तांचे लक्ष वेधले.  लोकायुक्तांनी मडकईकर यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीची स्थिती भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून जाणून घ्यावी,  अशी मागणीही अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी  केली आहे.