Tue, Nov 13, 2018 04:21होमपेज › Goa › डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे गर्भवती पत्नीचा मृत्यू

डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे गर्भवती पत्नीचा मृत्यू

Published On: Feb 24 2018 1:15AM | Last Updated: Feb 23 2018 11:54PMफोंडा : प्रतिनिधी

फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात यामिनी मीनानाथ गावडे (28, मुर्डी-खांडेपार) या गर्भवती महिलेचा   प्रसूतीनंतर मृत्यू झाला. इस्पितळातील डॉक्टर व कर्मचार्‍यांकडून निष्काळजीपणा झाल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची तक्रार मृत महिलेच्या पतीने फोंडा पोलिस स्थानकात दिली असून पोलिसांनी  कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. सदर घटना गुरुवारी घडली असून उपजिल्हाधिकारी याप्रकरणी तपास करीत आहे. 

यामिनी गावडे हिची प्रसूती गुरुवारी उपजिल्हा इस्पितळात झाली. मुलाला जन्म दिल्यानंतर यामिनी गावडे यांची प्रकृती खालावली. त्यानंतर काहीवेळानंतर तिला रुग्णवाहिकेतून गोमेकॉत नेण्यात आले. मात्र गोमेकॉत पोहचण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. उपजिल्हा इस्पितळातील डॉक्टर व कर्मचार्‍याकडून निष्काळजीपणा झाल्याने  यामिनी गावडे हीच मृत्यू झाल्याची तक्रार गुरुवारी रात्री उशिरा तिच्या पतीने केली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून उपजिल्हाधिकारी याप्रकरणी तपास करीत आहे. 

प्राप्त माहिती नुसार यामिनी व मीनानाथ गावडे यांचा विवाह दीड वर्षांपूर्वी झाला होता. त्यांच्या लग्नानंतर सात वर्षांपूर्वीच महिलेचा मृत्यू झाल्याने प्रकरणाचा तपास  उपजिल्हाधिकारी  करीत आहेत.