Thu, Nov 15, 2018 20:34होमपेज › Goa › सरकारी नोकरभरतीसाठी सप्टेंबरपर्यंत धोरण : पर्रीकर

सरकारी नोकरभरतीसाठी सप्टेंबरपर्यंत धोरण : पर्रीकर

Published On: Jul 31 2018 1:31AM | Last Updated: Jul 30 2018 11:47PMपणजी  ः प्रतिनिधी

सरकारी नोकर भरतीसाठी येत्या सप्टेंबरपर्यंत धोरण तयार केले जाणार आहे, असे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी विधानसभेत दिले.आमदार लुईझिन फालेरो यांनी राज्यात नोकर्‍यांबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना पर्रीकर यांनी उत्तर दिले. 

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासंदर्भात सरकार कटिबध्द आहे.त्यादृष्टीने सरकार कार्यरत आहे. राज्यातील आयटी उद्योगात गोमंतकीय युवकांना रोजगारासाठी प्राधान्य दिले नाही, तर सरकार त्या संबंधित कंपनीवर कडक कारवाई करेल, असा इशारा कामगार मंत्री रोहन खंवटे यांनी दिला.