Sun, Jul 21, 2019 09:53होमपेज › Goa › पणजी मनपा कार्यालयाची पोलिसांकडून झडती

पणजी मनपा कार्यालयाची पोलिसांकडून झडती

Published On: Jun 21 2018 1:25AM | Last Updated: Jun 20 2018 11:57PMपणजी : प्रतिनिधी 

पणजी महनगरपालिकेचे नगरसेवक उदय मडकईकर  यांनी  राबता दाखला प्राप्‍त करण्यासाठी  केलेल्या बनवेगिरीप्रकरणी पणजी पोलिसांनी   बुधवारी मनपा  कार्यालयाची झडती घेतली. यावेळी पोलिसांनी  राबता दाखल्यासंदर्भातील रजिस्टर तसेच  फाईल जप्‍त केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

मनपा नगरसेवक उदय मडकईकर व त्यांच्या  नातेवाईक गीता मडकईकर यांनी भाटले येथील त्यांच्या इमारतीसाठी  राबता  प्रमाणपत्र मिळविण्यासाठी   तत्कालीन    मनपा आयुक्‍त मेल्वीन वाझ यांची  बनावट सही  केल्याच्या तक्रारीवरून पणजी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.  मनपा आयुक्‍त अजित रॉय यांनी यासंदर्भात पणजी पोलिसांत तक्रार नोंद केली होती. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली.

या कारवाईमुळे   मनपा कार्यालयात  काही काळ गोंधळ उडाला. बनावट राबता दाखला प्रकरण हे  जानेवारी 2012 सालचे  आहे.  मनपा नगरसेवक उदय मडकईकर  व त्यांची  नातेवाईक गीता मडकईकर यांनी भाटले येथील त्यांच्या इमारतीसाठी   राबता दाखला प्राप्‍त करण्यासाठी  आपली बनावट सही  केल्याचे पत्र  माजी मनपा  आयुक्‍त  तथा   राज्य निवडणूक आयोगाचे   सचिव मेल्वीन वाझ यांनी मनपा आयुक्‍त रॉय यांना पाठविले होते. मडकईकर यांनी हे सर्व  कारस्थान  मनपाच्या तांत्रिक  विभागातील  दीपक सातार्डेकर तसेच  काही नगरसेवकांच्या मदतीने केले. त्यामुळे  त्यांच्याविरोधात एफआयआर नोंद करावी, अशी मागणीही  वाझ यांनी केली होती.