Mon, Aug 19, 2019 07:44होमपेज › Goa › पोलिस संरक्षणात ‘पद्मावत’ प्रदर्शित

पोलिस संरक्षणात ‘पद्मावत’ प्रदर्शित

Published On: Jan 26 2018 1:21AM | Last Updated: Jan 26 2018 12:03AMपणजी : प्रतिनिधी

वादाच्या भोवर्‍यात अडकलेला पद्मावत चित्रपट अखेर गुरुवारी राज्यातील लहान चित्रपटगृहात पोलिस संरक्षणात प्रदर्शित करण्यात आला. आयनॉक्स व अन्य मल्टीप्लेक्समध्ये मात्र  चित्रपट प्रदर्शित करण्यात आला नाही.

पद्मावत चित्रपट गोव्यात कायदा व सुव्यवस्थेत कुठलाही बिघाड न होता प्रदर्शित करण्यात गोवा पोलिसांना यश आले. मल्टीप्लेक्स असोसिएशनने गोवा, मध्यप्रदेश, गुजरात व राजस्थान या चार राज्यांमध्ये पद्मावत चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.  

पद्मावत चित्रपटाच्या तिकीटांसाठी राज्यातील मल्टीप्लेक्सच्या तिकीट काऊंटरबाहेर चित्रपट प्रेक्षकांनी तिकीट घेण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यात आला नसल्याचे सांगितल्याने लहान थिएटरांकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला. 

पद्मावत  स्क्रीनींगवेळी  कायदा  व सुव्यस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी स्थानिक पोलिसांनी चित्रपटगृहांना संरक्षणमुळेे होते.  अन्य राज्यांमध्ये या चित्रपटाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेेल्या हिंसेची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला, असे पोलिस महानिरीक्षक जस्पाल  सिंग यांनी सांगितले.