पणजी ः प्रतिनिधी
गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांच्या जीविताला धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना रविवारी पोलिस संरक्षण पुरवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सरकारने अन्न आणि औषध प्रशासनाला गुरुवार, दि.12 रोजी मडगाव घाऊक मासळी बाजारात घेतलेल्या मासळीच्या नमुन्यांचे चाचणी अहवाल खात्याच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचे निर्देश दिले.
प्राप्त माहितीनुसार एफडीएच्या बांबोळी येथील कार्यालयातील अधिकार्यांना पोलिसांचे संरक्षण देण्यात आले आहे. एफडीएने फार्मोलिनयुक्त मासळीच्या दोन्ही चाचण्यांचे अहवाल खात्याच्या संकेतस्थळावर घोषित करण्याच्या निर्देशानुसार रविवारी रात्री उशिरा अहवाल संकेतस्थळावर प्रसृत केले.