होमपेज › Goa › मुख्यमंत्र्यांविषयी अफवा पसवणार्‍यास पोलिस कोठडी

मुख्यमंत्र्यांविषयी अफवा पसवणार्‍यास पोलिस कोठडी

Published On: Apr 20 2018 1:17AM | Last Updated: Apr 19 2018 11:39PMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या तब्येतीविषयी  फेसबुकव्दारे  अफवा पसरवल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या केनेथ  सिल्वेरा याला दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 

केनेथ सिल्वेराची सदर प्रकरणी कसून चौकशी केली जात आहे.वास्कोचा रहिवासी असलेल्या सिल्वेरा याला बुधवारी (दि. 18) रात्री उशिरा अटक केली होती. अफवांव्दारे घबराट पसरवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांवरुन त्याला अटक करण्यात आली आहे. सदर पोस्ट सिल्वेराने बुधवारी  संध्याकाळी टाकली होती. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपचारासाठी अमेरिकेत आहेत. सिल्वेराने इंग्रजीतून पर्रीकरांविरोधात चुकीची पोस्ट टाकली होती. सिल्वेराने पर्रीकर यांच्या विरोधात पणजी मतदारसंघातून पोट निवडणूक लढवली होती. यात त्याचा दारुण पराभव झाला होता.