Tue, Apr 23, 2019 01:42होमपेज › Goa › पोलिसांवर गोळीबार करणार्‍या चौघांना अटक

पोलिसांवर गोळीबार करणार्‍या चौघांना अटक

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 1:20AM

बुकमार्क करा
पर्वरी : वार्ताहर

दिल्लीत पोलिसांवर गोळीबार करून फरारी झालेल्या विपिन सुनील डागर (वय 24, दिल्ली), प्रवीण सुरजय डागर (वय 23, दिल्ली)  आणि अजय कुमार किशनलाल अहावत (वय 22, हरियाणा) या संशयितांना कळंगुट पोलिसांनी मंगळवारी (दि.16) रात्री 11.30 च्या सुमारास जेरबंद  केले, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक चंदन चौधरी यांनी येथे  पत्रकार परिषदेत दिली. 

चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार  दि. 11 जानेवारी रोजी रात्री 11 च्या सुमारास स्वीफ्ट कार  दिल्ली विमानतळाच्या दिशेने निघाली होती. तेथे नाकाबंदी करत असलेल्या पोलिसांनी ती कार थांबवण्यासाठी हात केला असता कारचालकाने पोलिस जीपला धडक दिली तर आत बसलेल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. सुदैवाने पोलिसांना यात दुखापत झाली नाही. लगेच दिल्ली पोलिसांनी तेथील कांट पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला.

दिल्ली पोलिसांना संशयित गोव्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तातडीने गोवा पोलिसांनी हालचाली सुरू केल्या. गोव्यात तपासावेळी त्यातील एका संशयिताने कळंगुट परिसरात एटीएमचा वापर  उंटावाडो येथील वाईन  शॉपवर खरेदीसाठी केल्याचे समजले.