Wed, Jun 26, 2019 18:13होमपेज › Goa › सागरी उत्पादन निर्यात वाढीसाठी सर्वंकष आराखडा : सुरेश प्रभू

सागरी उत्पादन निर्यात वाढीसाठी सर्वंकष आराखडा : सुरेश प्रभू

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 12:28AMमडगाव  : प्रतिनिधी

येत्या काही वर्षांत सागरी उत्पादन निर्यात दुप्पट करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी येत्या तीन महिन्यांत सर्वंकष आराखडा तयार करणार आहे. राज्यांतील मत्स्यपैदास वाढवण्यासाठी उपाययोजना, विविध यंत्रणांशी गठबंधण, विपणन व्यवस्थेचे मजबुतीकरण आणि पुरवठा साखळीचे एकत्रिकीकरण अशा बाबींचा सर्वंकष आराखड्यात समावेश असेल, असे प्रतिपादन वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या, समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एमपीईडीए) यांनी भारत सागरी अन्न निर्यात संघटना (एसईएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने मडगाव येथे तीन दिवशीय ‘भारत आंतरराष्ट्रीय सी फूड महोत्सव 2018’ आयोजित केला आहे. एमपीईडीएद्वारे आयोजित सर्वोत्कृष्ट निर्यातदार बक्षीस वितरण सोहळ्यासमयी प्रमुख पाहुणे या नात्याने प्रभू बोलत होते.
यावेळी निर्यातसंबंधी विविध क्षेत्रांत विविध देशांतील 27 कंपन्यांना पारितोषिके  प्रदान करण्यात आली. 

केंद्रीय मंत्री प्रभू म्हणाले की, पूर्व किनारपट्टी भागात 70 टक्के मत्स्यपैदास  केंद्रित झाली आहे. अशाच पद्धतीचा अवलंब पश्‍चिम किनारपट्टी भागात करू शकलो तर नजीकच्या भविष्यात आपण एक लाख कोटी रुपये मूल्याची निर्यात करू शकतो.