होमपेज › Goa › धारगळ अपघातात शिक्षक ठार

धारगळ अपघातात शिक्षक ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पेडणे  :  प्रतिनिधी

महाखाजन धारगळ येथे मंगळवारी कोलवाळ पुलाजवळ अल्टो कारने पल्सर दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मूळ हाळी-चांदेल येथील सुरेंद्र अर्जुन नारुलकर (वय 54) शिक्षकाचा मृत्यू झाला.
पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन नारुलकर पत्नीसोबत आपल्या पल्सर मोटारसायकलने (जीए-03-ओ1593) हाळी चांदेल येथून सध्या ते राहत असलेल्या काणका बार्देश येथे घरी जात होते. महाखाजन येथे पोहोचताच समोरून आलेल्या अल्टो कारने (जीए-05-बी-3330) धडक दिल्याने दुचाकीस्वार नारुलकर व त्यांची पत्नी दोघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर जखमी अवस्थेत सुरेंद्र नारुलकर यांना म्हापसा येथील आझिलो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत  घोषित केले.

 नारुलकर यांची पत्नी किरकोळ जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  या अपघातात   कारचालक प्रशांत बाबली पंडित हेही किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारानंतर ताब्यात घेणार असल्याचे पेडणे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक सागर धाडकर यांनी सांगितले. उपनिरीक्षक सागर धाडकर, हवालदार मुकुंद परब यांनी अपघाताचा पंचनामा केला. पुढील तपास पेडणे पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अपघातास कारणीभूत ठरलेले अल्टो चालक प्रशांत बाबली पंडित यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.
 

 

 

tags ; Mahakhajan,news, Dhanjal, Alto, Car, Pulsar, Accident,


  •