Tue, Sep 25, 2018 14:29होमपेज › Goa › रशियन महिला अपघातात ठार

रशियन महिला अपघातात ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पेडणे  ;प्रतिनिधी 

चोपडे आगारवाडा सरकारी प्राथमिक शाळेजवळ झालेल्या अपघातात एना ड्रेम्लुया ही रशियन महिला पर्यटक जागीच ठार झाली. शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शाळेजवळ असलेल्या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने बुलेट दुचाकीवरील ताबा निसटल्याने तोल जाऊन ती रस्त्यावर कोसळली. त्याचवेळी मागून येणार्‍या टेम्पोखाली तिचे डोके सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

तर तिचा पती व्लादिमीर याला जखमी अवस्थेत म्हापशातील आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विदेशी महिला पर्यटक पतीसमवेत बुलेटवरून मोरजीकडून चोपडे शिवोलीकडे भरधाव वेगात जात होती. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ती चोपडे येथे प्राथमिक शाळेजवळ पोहचली असता तेथील  गतिरोधकाचा अंदाज न आल्यामुळे वाहनावरील ताबा निसटून ती रस्त्यावर आपटली. त्याचवेळी बाजूने जाणार्‍या टेम्पोच्या चाकाखाली ती सापडली. सदर गतिरोधक रंगवले नव्हते, शिवाय सूचना फलकही लावले नव्हते. त्यामुळे विदेशी पर्यटक महिलेला त्याचा अंदाज आला नाही. 
 


  •