Fri, Apr 19, 2019 12:07होमपेज › Goa › पर्रीकर उपचारांसाठी अमेरिकेत दाखल  

पर्रीकर उपचारांसाठी अमेरिकेत दाखल  

Published On: Aug 31 2018 1:38AM | Last Updated: Aug 31 2018 12:34AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर वैद्यकीय उपचारांसाठी भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री उशिरा अमेरिकेत दाखल  झाले. ते केवळ आठ दिवसांसाठी देशाबाहेर राहणार आहेत, अशी  माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. 
दरम्यान, राज्यात मुख्यमंत्र्यांना पर्याय शोधण्यावर सुरू झालेल्या वादावर भाजप आघाडी सरकारातील घटक  पक्षांनी पडदा टाकण्यास सुरुवात केली आहे. भाजप, मगो, गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष आमदारांनी ‘डॅमेज कंट्रोल’ सुरू केले आहे.  

भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर हे सध्या दिल्लीत आहेत. ते म्हणाले की, मुख्यमंत्री बदलाचा सध्या प्रश्‍नच येत नाही. मनोहर पर्रीकर हेच आमचे नेते असून ते पुढच्या आठवड्यात राज्यात परतणार आहेत. पर्रीकर यांच्यासोबत बुधवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत पर्यायी मुख्यमंत्री नेमण्याबाबत कसलीच चर्चा झाली नाही. 

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनीही पर्यायाची चर्चा नसल्याचे सांगून आपण अमित शहा किंवा अन्य कुणा भाजप नेत्याला राजकीय चर्चेसाठी भेटण्याचा प्रश्‍नच नाही, असे सांगितले. गोवा फॉरवर्ड पक्षाचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनीही ‘सध्या मुख्यमंत्रिपदासाठी जागा रिकामीच नाही’ असे सांगितले.