Thu, Apr 25, 2019 21:47होमपेज › Goa › ‘प्लास्टिक बंदी’चा आजपासून अंमल

‘प्लास्टिक बंदी’चा आजपासून अंमल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

पणजीत आज, रविवारपासून प्लास्टिक बंदीचा अंमल करण्यात येणार असून प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणारे विक्रेते व या पिशव्यांचा वापर करणार्‍या दुकानदारांना पणजी महानगरपालिकेने 1 एप्रिलपासून नोंदणी सक्‍तीची केली आहे.   प्लास्टिक पिशव्या वापरासाठी महानगरपालिका नोंदणीकृत दुकानदारांकडून प्रति महिना 4 हजार रुपयांप्रमाणे वर्षाला 48 हजार रुपये शुल्क आकारणार आहे. हे शुल्क खूप असल्याने लहान व्यापार्‍यांना फटका बसणार असल्याचे पणजी मार्केट समितीचे सचिव धर्मेंद्र भगत यांनी  सांगितले. 
पणजी शहरात प्लास्टिक पिशव्यांना बंदी घालण्याच्या दिशेने मनपाने पावले उचलली आहेत.

चाळीसपेक्षा कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्या विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 50 मायक्रॉनच्या पिशव्या विकणार्‍या विक्रेत्यांना आता मनपाने नोंदणी सक्‍तीची केली आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्‍या   नोंदणीकृत दुकानदारांकडून मनपा हे शुल्क दुकानदारांच्या ट्रेड लायसन्सच्या नूतनीकरणावेळी वसूल करणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.  जे दुकानदार व प्लास्टिक पिशव्या व्यापारी मनपाकडे नोंदणी न करताच  प्लास्टिक पिशव्यांचा विक्रीसाठी वापर करतील त्यांना पर्यावरण संरक्षण कायदा 1996 च्या कलम 46 अंतर्गत 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड व शिक्षा ठोठावली जाणार असल्याचेही  सूत्रांनी सांगितले. 

पणजी मार्केट समितीचे सचिव धर्मेंद भगत म्हणाले की, 40 पेक्षा कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्यांवर सरकारकडून बंदी  घालण्यात आल्याने त्याचा वापर करणे यापूर्वीच दुकानदारांनी बंद केले आहे. 50 मायक्रॉनच्या पिशव्या वापरण्यावर बंदी नाही. मग त्यासाठी मनपा शुल्क का आकारत आहे? 48 हजार रूपये शुल्क फार असून प्रत्यक्षात वर्षाला एखादा दुकानदार 5 हजार रुपयांच्या पिशव्यादेखील वापरत नसल्याने या निर्णयाचा लहान व्यापार्‍यांना फटका बसणार आहे. 
 

 

 

 

tags ; Panaji,news, today, plastic, ban,on,Sunday,


  •