Fri, Jul 19, 2019 15:50होमपेज › Goa › राज्यातील पारा ऽ19 अंशांवर

राज्यातील पारा ऽ19 अंशांवर

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 1:48AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

राज्यात किमान तापमानाचा पारा 19 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरल्यामुळे रात्रीप्रमाणे दिवसाही थंडी जाणवत आहे. पुढील पाच दिवस किमान तापमान 18  ते 19 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत नोंद होण्याची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. गोवा वेधशाळेच्या संकेतस्थळावर व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, रविवार, दि. 7 रोजी कमाल तापमान 31.4, किमान 19, सोमवार दि. 8 रोजी कमाल 19, किमान 31.4, दि. 9 रोजी कमाल 19, किमान 32, दि. 10 रोजी कमाल 19, किमान 32 आणि दि. 11 रोजी कमाल तापमान 19 अंश डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 32 अंश डिग्री सेल्सिअस इतके नोंद होण्याची शक्यता आहे.