Mon, Apr 22, 2019 11:39होमपेज › Goa › परिमल वाघेलांच्या ‘स्टील लाईफ’ चे प्रदर्शन

परिमल वाघेलांच्या ‘स्टील लाईफ’ चे प्रदर्शन

Published On: Dec 18 2017 2:30AM | Last Updated: Dec 18 2017 1:02AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

गुजरात राज्य ललित कला अकादमीतर्फे गोवा कला अकादमीच्या कला दालनात चित्रकार परिमल वाघेला यांनी रेखाटलेल्या स्थिर चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. वाघेला यांनी रेखाटलेल्या   स्टील लाईफ चित्रांतील 40 चित्रे याठिकाणी प्रदर्शनाला ठेवण्यात आली आहेत. या चित्रांमध्ये ‘मॉर्निंग टी’, ‘अ‍ॅडिक्शन’, ‘लाईफ सायकल’, तुळशी वृंदावन, ‘सनलाईट’, ‘पेपर प्लांट’, ‘येलो रोजेस’, मित्रत्व, ‘लेट्स प्ले’, ‘मेरी क्रिसमस’, ‘व्हाईट फ्लॉवर’, ‘एम्प्टी ग्लासेस’ अशा शिर्षकांतर्गत रेखाटलेल्या चित्रांचा समावेश असून त्यांची प्रत्येकी किंमत 40 हजार  रुपयांपर्यंत आहे. 

परिमल वाघेला यांनी सांगितले, की  स्थिर चित्रकलेत वर्तमानपत्रांतून भाव प्रकट करणार्‍या चित्रांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. वर्तमानपत्रांची संकल्पना घेऊन त्यावरून काढलेल्या चित्रांतून विचार प्रकट केले असल्याचे वाघेला यांनी सांगितले. अहमदाबाद येथील वाघेला यांच्या चित्रांचे गोव्यातील कला अकादमीत  प्रथमच प्रदर्शन भरविले असून हे त्यांचे 16 वे प्रदर्शन आहे. वाघेला व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असून लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असल्याने त्यातही स्थिरचित्रे फार आकर्षित करतात, असेही त्यांनी सांगितले. सदर चित्रप्रदर्शन 19 डिसेंबर पर्यंत रोज सकाळी 10 ते संध्या. 7.30 पर्यंत रसिकांसाठी खुले आहे.