Thu, Apr 25, 2019 17:53होमपेज › Goa › राज्यात कंत्राटी शेती सुरू करण्याचा विचार : पर्रीकर

राज्यात कंत्राटी शेती सुरू करण्याचा विचार : पर्रीकर

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 06 2017 11:11PM

बुकमार्क करा

पणजी ः प्रतिनिधी

राज्यात कृषी उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने कंत्राटी शेती सुरू करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. यासाठी जमिनीची किंमत ज्या व्यक्तीला समजेल, तो राज्याच्या हितासाठी निश्‍चितच योगदान देईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. करंजाळे  येथे कृषी भवनात आयोजित भू-संसाधन नमुना आणि मॅपिंग अहवाल जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.   कृषीमंत्री विजय सरदेसाई म्हणाले, 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा उद्देश केंद्र सरकारचे आहे. आरोग्य कार्डामुळे शेतकर्‍यांना मातीची गुणवत्ता पाहून चांगले पीक घेण्यास मदत होईल. शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकार कटिबध्द असून राज्यातील शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेती करावी, कृषी उत्पादनाचे ब्रँड तयार करावेत.

 डॉ. एस. के. सिंग यांनी शेतजमिनींचे वैशिष्ट्य आणि मॅपिंग याची माहिती दिली. यावेळी कृषीमंत्री  विजय सरदेसाई, जलस्त्रोत मंत्री विनोद पालयेकर, कृषी खात्याचे सचिव बी. आर. सिंग, कृषी विज्ञान संस्थेचे संचालक ई. चकुरकर उपस्थित होते. कृषी संचालक  नेल्सन यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सहायक संचालक चिंतामणी पेरणी यांनी सूत्रसंचालन केले. दीपक राऊत यांनी आभार मानले.