Mon, Feb 18, 2019 20:32होमपेज › Goa › ‘ओखी’बाधित राज्यांसाठी गोव्याची 5 कोटींची मदत

‘ओखी’बाधित राज्यांसाठी गोव्याची 5 कोटींची मदत

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 06 2017 11:54PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

‘ओखी’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या लक्षद्वीप, केरळ,  तामिळनाडू आदी राज्यांना गोवा सरकारकडून 5 कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान मदत निधीत  देण्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी जाहीर केले. पर्वरी येथे मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पर्रीकर म्हणाले, की ओखी वादळामुळे लक्षद्वीप व अन्य राज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गोव्यातर्फे या राज्यांना मदतनिधी म्हणून 5 कोटी रूपये  देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने  निर्णय घेतला आहे.

गोव्यातील किनारी भागाला व शॅक्सनाही ओखी वादाळाचा फटका बसला आहे. मात्र  वादळाबरोबर रविवारच्या ‘पौर्णिमे’मुळे भरतीच्या लाटा उसळल्या आहेत. पौर्णिमेवेळी असा प्रकार नेहमी घडत असला तरी यावेळी ‘सुपरमून’ असल्याने वादळाचा प्रभाव आणखी वाढला. त्यादिवशी वादळ नसते तरी भरतीमुळे लाटा शॅक्समध्ये घुसल्या असत्या. वादळामुळे नुकसान  वाढल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. ओखी सारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी ‘मानक कार्यप्रणाली’ तयार करण्याच्या कामाला सुरवात झाली आहे.