Fri, Aug 23, 2019 22:20होमपेज › Goa › सिद्धार्थ याचे समारोप सोहळ्यात सादरीकरण

सिद्धार्थ याचे समारोप सोहळ्यात सादरीकरण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : तेजा आरोंदरकर

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप ‘अ जंटलमन’ अर्थात प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्या सादरीकरणाने  होणार आहे. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर  मंगळवारी (दि. 28)  संध्याकाळी 4 वाजता रंगारंग कार्यक्रमाच्या सादरीकरणाने ‘इफ्फी’ला निरोप दिला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनापासून समारोपापर्यंत बॉलीवूडमधील दिग्गजांची उपस्थिती लक्षणीय ठरत आहे. अभिनेता शाहरुख खान,  शाहीद कपूर, नाना पाटेकर, अभिनेत्री श्रीदेवी, भूमी पेडणेकर आदी कलाकार तसेच निर्माते आणि दिग्दर्शकांची ‘इफ्फी’तील उपस्थिती प्रतिनिधींसाठी पर्वणी ठरत आहे.  अभिनेते  सिद्धार्थ मल्होत्रा याचे समारोप सोहळ्यात सादरीकरण म्हणजे ‘सोने पे सुहागा’ ठरणार आहे,

अशा प्रतिक्रिया प्रतिनिधींनी व्यक्त केल्या आहेत.  सिद्धार्थ काही प्रसिद्ध गाण्यांवर ठेका धरणार असून, या सोहळ्यात अभिनेत्री कॅटरिना कैफ हिची प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थिती असणार आहे. अभिनेता सलमान खान महोत्सवाचा समारोप करणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा याने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यांच्यासोबत आलिया भट आणि वरूण धवन यांचाही हा पहिला चित्रपट होता. त्यानंतर मल्होत्रा याने ‘बार बार देखो,’ ‘कपूर अँड सन्स,’ ‘ब्रदर्स,’ ‘एक व्हिलन’ आदी चित्रपटांतून अभिनयाद्वारे आपली छाप उमटवली आहे. ‘इफ्फी’च्या समारोप सोहळ्याच्या रंगारंग कार्यक्रमानंतरर पाब्लो सिजर दिग्दर्शित ‘थिंकिंग ऑफ हिम’ हा समारोपाचा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.