Wed, Feb 20, 2019 05:24होमपेज › Goa › पणजीत १३०० किलो गोमांस जप्त; युवक अटकेत

पणजीत १३०० किलो गोमांस जप्त; युवक अटकेत

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 26 2017 1:32AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

बेळगावहून गोव्यात बेकायदेशीररित्या   वाहतूक करण्यात येणारे 1300 किलो गोमांस सोमवारी पणजी पोलिसांनी पाटो येथे जप्त केले. याप्रकरणी सुभानी देसाई (रा.बेळगाव) या 32 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली.

पाटो पणजी येथील एका हॉटेलजवळ सकाळी 6 वाजता जीए 03-टी-9835 या बोलेरो जीपमधून गोमांस नेले जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. बेळगाव ते पणजी कोणत्याच कागदपत्रांशिवाय गोमांसाची वाहतूक केली जात होती. याप्रकरणी सुभानी देसाई याला पोलिसांनी अटक केली. पणजी पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक उत्कंठराव देसाई यांनी ही कारवाई केली.