Sun, Oct 20, 2019 11:23होमपेज › Goa › कॅसिनो : जीएसटीद्वारे ४० कोटींचा महसूल 

कॅसिनो : जीएसटीद्वारे ४० कोटींचा महसूल 

Published On: Dec 31 2017 2:11AM | Last Updated: Dec 31 2017 1:58AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

 राज्यातील कॅसिनोंना लागू करण्यात आलेल्या 28 टक्के जीएसटीमुळे राज्य सरकारला कॅसिनोंद्वारे 40.11 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असल्याची माहिती  व्यावसायिक कर खात्याने  जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू केला आहे.  त्यानुसार राज्यातील कॅसिनोंना 28 टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. यात 14 टक्के  केंद्रीय

जीएसटी व 14 टक्के राज्य जीएसटीचा समावेश आहे. जीएसटी लागू करण्यापूर्वी कॅसिनोंमध्ये 1 हजार रुपये प्रवेश शुल्क  तसेच गोवा मनोरंजन कर कायदा 1964  अंतर्गत कॅसिनोंमध्ये खेळण्यासाठी  केल्या जाणार्‍या चिप्स विक्रीवर 15 टक्के  कर आकारला जात होता.  मात्र 1 जुलै 2017 पासून   मनोरंजन कर तसेच कॅसिनोंवरील इतर व्यवहारांवरील करांऐवजी जीएसटी  लागू करण्यात आला आहे. कॅसिनोंना लागू करण्यात आलेल्या 28 टक्के जीएसटीत  कॅसिनोंमधील  प्रवेश कर  तसेच  कॅसिनोंमध्ये  खेळण्यासाठी  केल्या जाणार्‍या चिप्सच्या विक्री कराचा समावेश करण्यात आला आहे.