Wed, Mar 27, 2019 05:56होमपेज › Goa › चित्रपट निर्मिती दिग्दर्शकांच्या सर्जनशीलतेवर अवलंबून

चित्रपट निर्मिती दिग्दर्शकांच्या सर्जनशीलतेवर अवलंबून

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

चित्रपट निर्मिती ही पूर्णपणे चित्रपटाची कथा व दिग्दर्शकांच्या सर्जनशीलतेवर अवलंबून असते. त्या चित्रपटात नामवंत कलाकार असला म्हणजे तो चित्रपट आपोआप कलेचे व्यासपीठ सोडून व्यवसायाकडे वळतो, असे मत प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक, निर्माते तथा अभिनेते शेखर कपूर यांनी व्यक्त केले.‘इफ्फी’त आयोजित मास्टर क्लासमध्ये शेखर कपूर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत अभिनेते सुशांत सिंह राजपूत उपस्थित होते. राजपूत यांनी शेखर कपूर यांना चित्रपटाच्या निर्मिती, दिग्दर्शनाविषयी अनेक प्रश्‍न विचारले. 

शेखर कपूर म्हणाले की, आपण हाती घेतलेल्या प्रत्येक चित्रपटाच्या शूटिंगवेळी आपल्या डोक्यात कोणतीही कल्पना नसते. ज्यावेळी आपला मेंदू रिकामा असतो त्याचवेळी आपल्याला कल्पनेच्या पुढे जाऊन काही तरी शिकायला मिळते. दिग्दर्शकाचे ‘भय’ हेच त्याला वेगळ्या कल्पकतेकडे पोचायला  मदत करतेे. शूटिंगचा तो क्षणच आपल्याला सांगू शकतो, की आपल्याला शॉट नेमका कसा  अपेक्षित आहे. माणसाच्या प्रामाणिकपणात खूप ताकद असते व त्यावरच सारे काही अवलंबून असते. प्रामाणिक राहून विचार केल्यासच नेमके प्रेक्षकांना काय द्यायचे आहे, याची अनुभूती दिग्दर्शकाला होते.