Tue, Feb 19, 2019 16:12होमपेज › Goa › खासगी प्रवासी बससेवा 6 तास बंद

खासगी प्रवासी बससेवा 6 तास बंद

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 12:08AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

कदंब महामंडळाच्या  कर्मचार्‍यांनी खासगी बसचालकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ खासगी बसवाल्यांनी पणजीतून होणारी प्रवासी वाहतूक सेवा      दुपारी 12 वाजल्यापासून 6  तास  बंद   ठेवली. खासगी बसचालकांनी  मारहाण प्रकरणी संशयित  सुंदर जल्मी या ‘कदंब’च्या कर्मचार्‍याच्या अटकेची मागणी करून पणजी पोलिस  स्थानकासमोर निदर्शने केली. संध्याकाळी संशयित जल्मीच्या अटकेनंतर निदर्शने आणि बंद मागे घेण्यात आला.  

कदंब कर्मचार्‍याने खासगी बसच्या चालकाला मारहाण केल्याची ही घटना गुरुवार दि. 11 जानेवारी रोजी घडली होती.  या प्रकरणी त्याच  दिवशी सुंदर जल्मीसह इतर तिघांच्या विरोधात पणजी पोलिस स्थानकात तक्रार  नोंदवण्यात आली होती. तक्रार नोंदवूनही कारवाई होत नसल्याचे पाहून   राज्यभरातील खासगी बसमालकांनी पणजीहून जाणार्‍या सर्व बसेसची सेवा  स्थगित ठेवली. पोलिस जोवर कारवाई करत नाहीत,  तोवर बस सेवा सुरू  करणार नाही यावर अडून बसल्याने    पणजीहून  अन्यत्र जाण्यासाठी  निघालेल्या प्रवाशांचे बरेच हाल झाले.