Wed, Sep 19, 2018 19:05होमपेज › Goa › प्लास्टिक राष्ट्रध्वज वापरावर राज्यात बंदी

प्लास्टिक राष्ट्रध्वज वापरावर राज्यात बंदी

Published On: Jan 17 2018 2:12AM | Last Updated: Jan 17 2018 2:02AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

प्लास्टिक राष्ट्रध्वज तयार करण्यावर आणि  विकण्यावर  उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकार्‍यांनी बंदी  घातली असून तसे कृत्य करताना कोणी आढळल्यास  संबंधित व्यक्तीला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ‘प्रतीक आणि नावे (अनुचित वापर प्रतिबंध) कायदा-1950’ अन्वये हा गुन्हा असून राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान आहे. कायद्यानुसार या गुन्ह्याला  शिक्षा आहे. सार्वजनिक ठिकाणी यंदाचा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित करणार्‍यांनी या बाबींचे पालन करणे आवश्यक असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.