Mon, May 27, 2019 00:51होमपेज › Goa › मोपा विमानतळाचे अनेक दुष्परिणाम : तावारीस 

मोपा विमानतळाचे अनेक दुष्परिणाम : तावारीस 

Published On: Mar 04 2018 1:24AM | Last Updated: Mar 04 2018 1:08AMपणजी : प्रतिनिधी

मोपा  विमानतळ गोव्याच्या हिताचा नसतानाही सरकार विमानतळाला पाठिंबा देत आहे. हा प्रकल्प गोव्याच्या हिताचा असल्याचे सरकारकडून सांगितले जात असले तरी याचे खूप दुष्परिणाम खूप वाईट असतील, असे मत अविनाश तावारीस यांनी व्यक्त केले. इन्स्टिट्यूट  मिनेझिस ब्रागंझा सभागृहात गोवन्स फॉर दाबोळी ओन्ली या संघटनेतर्फे आयोजित चर्चासत्रात तावारीस बोलत होते. यावेळी तावारीस यांनी दाबोळी विमानतळासंदर्भात पीपीटी सादर केली. त्यांच्यासोबत संघटनेचे इतर सदस्यही उपस्थित होते.

तावारीस म्हणाले, विकास, पर्यटनवाढ, स्थानिकांना रोजगार यांसारख्या विकासाच्या गोष्टी सांगितल्या जात असल्या तरी याचे दुष्परिणामही अनेक आहेत. हा प्रकल्प विकासाच्या नावाखाली सरकारी व्यवस्थेचा भाग असणार्‍या व या प्रकल्पाशी निगडित असलेल्यांच्या फायद्यासाठीचा असावा, असेही त्यांनी सांगितले. 

मोपा विमानतळ प्रकल्पाची एकूण जागा पाहता लोकांची रहदारी व  इतर गोष्टी याठिकाणी ठेवणे अशक्य आहे.  रस्त्यांचा व  वाहतूक नियंत्रणाचा शून्य अभ्यास असल्याचे या प्रकल्पाचा अहवाल सांगतो. दरम्यान, जीएमआर कंपनीचा दाबोळी येथील जागा विकत घेण्यासाठी  एक्सिस बँकेकडे कर्जासाठी करार आहे. यातील कर्ज प्रक्रियेतील कागदपत्रात ‘जागेबाबत न्यायालयात प्रकरण आहे का?’असा प्रश्‍न आहे.

परंतु, या जागेप्रकरणात तीन केसेस न्यायालयात असतानाही  संबंधित कंपनी व बँक दोघांनीही याचा उल्लेख केलेला  नसून या प्रश्‍नापुढील उत्तराची जागा रिक्त आहे. दाबोळी विमानतळ जरी बंद पडले तरी येथील जमिनीची किंमत आजच्या घडीला 13 हजार कोटींची असल्याने या जागेचा महसूल कंपनीला काही न केल्याही मिळणार असल्याचे तावारिस यांनी सांगितले. त्यामुळे यात जमीन व बँकेतील कागदपत्रांमध्ये घोटाळा असल्याचे तावारीस म्हणाले.