Sat, Jan 19, 2019 14:31



होमपेज › Goa › मुलीचा विनयभंग, पुण्यातील ११ जणांना अटक

मुलीचा विनयभंग, पुण्यातील ११ जणांना अटक

Published On: May 30 2018 5:07PM | Last Updated: May 30 2018 5:07PM



पणजी : प्रतिनिधी

गोव्यातील बागा बीचवर एका १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील ११ पर्यटकांना गोव्यातून पळून जाण्याआधीच पकडले आहे. यातील दोघे जण अल्पवयीन असून त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

बागा बीचवर ही मुलगी तिच्या १७ वर्षीय भावासह बसली होती. तिचे आई-वडील तिथून जवळच एका स्टॉलवर नाश्ता करत होते. त्याचवेळी ११ जणांच्या टोळक्याने पीडित मुलीचा विनयभंग केला. या मुलीचे फोटो काढताना तिची छेड काढण्याचा प्रयत्नही या टोळक्याने केला. पीडितेच्या भावाने त्यांना प्रतिकार केला असता, त्याला मारहाण करण्यात आली. याबाबत पीडित मुलीच्या आई-वडिलांनी कळंगुट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी तातडीने पावले उचलत गोवा सोडून जाण्याआधीच सर्व आरोपींना अटक केली आहे. ११ जणांपैकी २ जण १५ वर्षांचे असून त्यांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे, असे पोलीस अधिकारी जिवबा दळवी यांनी सांगितले. ज्या मोबाईलमधून पीडित मुलीचे फोटो काढण्यात आले आहेत तो मोबाइल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.