Sat, Nov 17, 2018 00:12होमपेज › Goa › मेलवानींच्या चिथावणीमुळे आंदोलन हिंसक

मेलवानींच्या चिथावणीमुळे आंदोलन हिंसक

Published On: Mar 24 2018 1:48AM | Last Updated: Mar 24 2018 1:48AMपणजी : प्रतिनिधी

पणजीत 19 मार्च रोजीच्या खाण अवलंबितांनी काढलेल्या  मोर्चावेळी खाण व्यावसायिक हरीष मेलवानी यांनी आंदोलकांना चिथावल्यानेच आंदोलन हिंसक बनले, असा दावा पणजी पोलिसांनी मेलवानी यांनी   पणजी न्यायालयात  दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीवेळी केला. या अर्जावरील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.

दरम्यान,  मेलवानी  यांना  आंदोलनाप्रकरणी  पणजी पोलिसांनी सलग दुसर्‍यांदा समन्स बजावले आहे. आपण आज, शनिवारी पोलिस स्थानकात उपस्थित  राहणार आहोत, असे मेलवानी यांनी सांगितले. मेलवानी   यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर  काल, शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी,  पणजी पोलिसांनी  न्यायालयात  म्हणणे मांडताना सांगितले की,  आंदोलनादिवशी त्याठिकाणी उपस्थित मेलवानी यांनी   आंदोलकांना चिथावले. या चिथावणीमुळेच   आंदोलकांनी पोलिसांवर हल्‍ला केला.  

आंदोलनावेळी   खाण आंदोलकांनी रस्ता अडवून लोकांना त्रास दिला. त्यांनी केलेल्या  दगडफेकीत   सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले. या आंदोलनात सहभागी झालेल्या    अन्य संशयितांची ओळख पटण्यासाठी मेलवानी यांची   पोलिस कोठडीत चौकशी होणे आवश्यक  आहे. मेलवानी पुन्हा आंदोलन चिथावू  शकतात,  असेही यावेळी  नमूद करण्यात आले. 
 

tags : Panaji,news,mining, movement, Violent, in Panaji,