Tue, Jun 18, 2019 21:10होमपेज › Goa › पणजीत 50 लाखांचे लॅपटॉप जप्त

पणजीत 50 लाखांचे लॅपटॉप जप्त

Published On: Jan 21 2018 2:45AM | Last Updated: Jan 21 2018 2:34AMपणजी : प्रतिनिधी

वजन व माप खात्याने सांतीनेज-पणजी येथे छापा टाकून वजन व माप कायद्याचे उल्लंघन करून विक्री करण्यात येणारे 50 लाख रुपये किंमतीचे 94 लॅपटॉप व 109 प्रिंटर कार्टीज जप्त केले. खात्याच्या मळा विभागाच्या निरीक्षक  रंजना बोरकर  यांनी ही कारवाई  वजन व माप खात्याचे नियंत्रक  के. बी. कोसंबे व सहायक  नियंत्रक पी. व्ही. नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या कारवाईत  खात्याचे निरीक्षक  डी. एन. मापारी, एन. पी. पुरुशन, तुकाराम  कुडाळकर, नितेश नाईक  यांनी सहकार्य केले.