Tue, Mar 19, 2019 09:15होमपेज › Goa › खोतीगाव अभयारण्यात १२ पासून पक्षी महोत्सव

खोतीगाव अभयारण्यात १२ पासून पक्षी महोत्सव

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 11:22PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

काणकोण येथील खोतीगाव अभयारण्यात दि. 12 ते 14 जानेवारी 2018  या कालावधीत वन खात्यातर्फे पक्षी महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती गोवा पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. यंदा या महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे. मागीलवर्षी बोंडला येथे हा महोत्सव झाला होता. पक्षी प्रेमींना विविध पक्ष्यांची माहिती देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन वन खात्याकडून मागीलवर्षापासून केले जातेे. देशी-विदेशी पर्यटकांना या महोत्सवाकडे आकर्षित करण्याच्या हेतूने महोत्सवाची माहिती संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.  

महोत्सवात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा समावेश करण्यात येणार असून यात स्थलांतरीत पक्ष्यांचाही समावेश असेल. महोत्सवावेळी पक्षी प्रेमींना त्यांचे निरीक्षण करण्याची संधी मिळेल. पक्ष्यांची माहिती देणारे प्रदर्शन, कार्यशाळा व विविध कार्यक्रमांचा यात समावेश असेल. महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.   वन खात्यातर्फे मागील वर्षी प्रथमच पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बोंडला येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवास देशी विदेशी पर्यटकांबरोबरच स्थानिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता. यंदाही याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा वन खात्याने व्यक्त केली आहे.