Thu, Dec 12, 2019 08:38होमपेज › Goa › आयटी कंपन्यांना  ४ महिन्यात प्लॉटस्   

आयटी कंपन्यांना  ४ महिन्यात प्लॉटस्   

Published On: Dec 16 2017 1:41AM | Last Updated: Dec 15 2017 10:55PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

चिंबल येथे उभारण्यात येणार्‍या आयटी पार्क मधील भूखंड  येत्या  तीन ते चार महिन्यात  आयटी कंपन्यांना  दिले  जाणार आहेत,अशी माहिती  आयटी मंत्री रोहन खवटे यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासात दिली.  तुये येथील इलेक्ट्रॉनिक सिटी तसेच चिंबल  येथील आयटी पार्क  कधी पर्यंत सुरू होणार,या  हळदोणेचे आमदार  ग्लेन टिकलो यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.

 मंत्री खवटे म्हणाले,तुये येथील इलेक्ट्रॉनिक सिटी तसेच चिंबल  येथील आयटी पार्कची संकल्पना ही 2014 सालची आहे.  या दोन्ही प्रकल्पांमध्ये रोजगार  हा सरकारचा प्रमुख ध्येय आहे. तुये येथील  इलेक्ट्रॉनिक सिटीत 2.73 लाख चौरस मीटरचे   एकूण 60 भूखंड असून त्यासाठी लागणारी  नगरनियोजन खात्याची  मंजुरी मिळाली आहे. 

 चिंबल येथील आयटी पार्कसाठी 2.69 लाख चौरस मीटर्स जागा निश्‍चित करण्यात आली होती. या पार्क साठी आता 1.78 लाख चौरस मीटर मीटर्स अतिरीक्त  जागा मंजूर करण्यात आली आहे. आयटी पार्क मधील भूखंड  येत्या  तीन ते चार महिन्यात  आयटी कंपन्यांना वितरीत केले जातील. या दोन्ही प्रकल्पांसाठीची स्टार्टअप योजना  लवकरच  सुरू केली जाणार असून  मार्च महिन्यापर्यंत ‘एचआर’ योजनाही तयार केली जाईल. या  दोन्ही प्रकल्पामध्ये गोमंतकीयांना प्राधान्य दिले जाईल. तुये येथील  इलैक्ट्रोनिक  सिटी प्रकल्पात 3 ते 4 हजार तर चिंबल  आयटी प्रकल्पात 4 ते 5 हजार  रोजगारांची निर्मिती होईल.