Sun, Sep 23, 2018 18:37होमपेज › Goa › ‘फलोत्पादन’ भाजीपाला पुरवणार

‘फलोत्पादन’ भाजीपाला पुरवणार

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 06 2017 11:08PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

सध्या पडणार्‍या पावसाचा परिणाम भाजीपाल्यावर होत आहे. फलोत्पादन महामंडळातर्फे पुढील दोन  आठवड्यांत चांगल्या प्रकारची भाजी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण झांट्ये यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

झांट्ये म्हणाले, राज्यातील सुमारे 900 फलोत्पादन केंद्रांमधून स्वस्त दरात भाजीपाल्याची विक्री केली जातेे. मात्र, या भाजीपाल्याच्या दर्जाबाबत ग्राहकांच्या तक्रारी वाढल्याने याची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाचा भाजीपुरवठा करण्यावर भर दिला जाईल. भाजीपाल्याचा दर्जा पाहण्यासाठी दर पंधरा दिवसांनी बेळगाव येथील भाजी बाजारपेठेत गोवा फलोत्पादन महामंडळाचे अधिकारी भेट देतील. दरमहा फलोत्पादन केंद्रधारक व अधिकारी यांची बैठक  घेऊ.

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव केळकर म्हणाले, भाजीपाल्याच्या दर्जाबाबत तक्रारी येत असल्याने महामंडळाच्या पथकाने बेळगाव येथील बाजारपेठेत भेट देऊन भाजीपाल्याची पाहणी केली होती. या पाहणीत अवकाळी पावसामुळे शेतातून बाजारपेठेत भाजीपाला येईपर्यंत खराब होत असल्याचे आढळले. भाजीपाल्याचा दर्जा चांगला राखण्यासाठी प्रयत्न केले जातील.