होमपेज › Goa › ‘थर्टी फर्स्ट’साठी गोवा सज्ज

थर्टी फर्स्ट’साठी गोवा सज्ज

Published On: Dec 31 2017 2:11AM | Last Updated: Dec 31 2017 2:01AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

मावळत्या 2017  वर्षाला निरोप देऊन 2018 या नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यास ‘थर्टी फर्स्ट’साठी गोवा सज्ज आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी राजकीय नेते, मंत्रिगण, बॉलिवूड कलावंत सेलिब्रेटी गोव्यात दाखल होण्यास सुरुवात  झाली आहे. दरम्यान, ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्‍वभूमीवर गोवा पोलिसही सुरक्षेबाबत सज्ज झाले असून सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ‘थर्टी फर्स्ट’निमित्त  आज (रविवार) राज्यात ठिकठिकाणी विशेषतः किनारी भागांमध्ये  पार्ट्या आयोजित करण्यात आल्या आहेत. नववर्षानिमित्त राज्याच्या वेगवेगळ्या चर्चमध्ये  मध्यरात्री 12 वाजता  प्रार्थनासभा होणार आहेत.
नववर्ष स्वागतावेळी कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी राज्यात ठिकठिकाणी सशस्त्र पोलिसांबरोबर वाहतूक पोलिस व गृहरक्षक मिळून एक हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे. रात्रीच्यावेळी गस्त घालण्याबरोबरच वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.  

खासगी हॉटेलांबरोबरच, गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या हॉटेल्स, पब, क्रुझ बोटीवरही  पार्ट्या तसेच  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय घरोघरीदेखील  अनेकांनी आपल्या मित्र-परिवारासमवेत छोटेखानी पार्ट्यांचे आयोजन केले आहे.  नववर्ष स्वागतासाठी काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, बॉलिवूड कलाकार रिचा चढ्ढा, मलायका अरोरा गोव्यात दाखल झाले आहेत.  त्याचबरोबर इतरही काही  बॉलिवूड कलाकार, क्रीडापटू, मंत्रिगण  दाखल होऊ लागले असून  गोव्यात नववर्षानिमित्त  पर्यटकांचा महापूर लोटत आहे.